Home क्राईम संगमनेर: टोलनाक्यावर चार चाकी चालकाची तलवारीची  दहशत, कर्मचाऱ्याला मारहाण

संगमनेर: टोलनाक्यावर चार चाकी चालकाची तलवारीची  दहशत, कर्मचाऱ्याला मारहाण

Sangamner Crime: टोल भरण्याच्या कारणावरून तलवारीचा धाक दाखवून  दहशत निर्माण केल्याची  तसेच तेथील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना.

Sangamner Crime Four wheeler driver attacked with sword at toll booth, employee beaten

संगमनेर : छोटा हत्ती या चारचाकी वाहनातून आलेल्या पाच-सहा जणांनी टोलनाक्यावर टोल भरण्याच्या कारणावरून तलवारीचा धाक दाखवून  दहशत निर्माण केल्याची  तसेच तेथील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.  नाशिक-पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाका येथे शनिवारी (दि. २५) रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात पाच-सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

योगेश सुभाष काळे (हिवरगाव पावसा टोलनाक्यावरील कर्मचारी, रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, टोल नाक्याच्या लेनक्रमांक आठवर छोटा हत्ती हे चारचाकी वाहन आले. त्यावेळी तेथे योगेश काळे आणि त्यांचे सहकारी होते. वाहनातील अनोळखी पाच-सहा जणांनी टोल भरण्याच्या कारणावरून वाद घातला. सुपरवायझर विलास राहणे व भागवत त्यांना समजावून सांगत असताना वाहनात बसलेले खाली उतरले. ‘आम्ही टोल भरणार नाही’ असे म्हणून त्यांनी शिवीगाळ दमदाटी करून विलास राहणे याची कॉलर पकडली. योगेश काळे हे वाद मिटविण्यासाठी मध्ये पडले, त्यावेळी त्यांना एकाने उचलून खाली आपटल्याने त्यांचा डाव हात फ्रॅक्चर झाला. वाहनातील एक जण धाक दाखविण्यासाठी तलवार घेऊन तेथे आला. पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉस्टेबल ए. बी. पारधी अधिक तपास करत आहेत.

Web Title: Sangamner Crime Four wheeler driver attacked with sword at toll booth, employee beaten

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here