Home संगमनेर खळबळजनक: संगमनेर शहरात चोरट्यांनी एटीएम फोडून २५ लाख लंपास

खळबळजनक: संगमनेर शहरात चोरट्यांनी एटीएम फोडून २५ लाख लंपास

Sangamner Atm Theft: गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले, २५ लाख रुपयांची रोकड लंपास.

Sangamner city, thieves broke ATM and theft 25 lakhs

संगमनेर: संगमनेर शहरात आज पहाटे तीन वाजता खळबळजनक घटना घडली. शहरातील दिल्ली नाका परिसरात एक्सिस बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्याने फोडले असून सुमारे २५ लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे.

चोरट्यांनी प्रथम एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे कट केले. त्यानंतर आत प्रवेश करुन गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले. त्यातील सुमारे 25 लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरुन नेली आहे. सकाळी पैसे काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांच्या ही घटना लक्षात आली. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली.

माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एटीएमच्या जवळपास असलेल्या इतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका स्वीप्ट कारमधून चोरटे आल्याचे दिसून येत आहे. त्यादृष्टीने पोलीस पुढील तपास करत आहे. पोलिसांची दोन पथके तपासासाठी रवाना करण्यात आली आहे.

Web Title: Sangamner city, thieves broke ATM and theft 25 lakhs

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here