Home Suicide News संगमनेर: तलावात उडी मारून आत्महत्या केल्याप्रकरणी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर: तलावात उडी मारून आत्महत्या केल्याप्रकरणी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

Sangamner case against his wife for jumping into a lake and committing suicide

संगमनेर | Suicide: माहुली शिवारात पाझर तलावात उडी मारून पतीने आत्महत्या केल्याप्रकरणी पत्नीविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहुली शिवारात पाझर तलावात गणेश तुकाराम घोडेकर रा. पिंपळगाव खांड वय ३१ वर्ष या तरुणाचा मृतदेह मंगळवारी सकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आला होता. याप्रकरणी मयत तरुणाचे वडील तुकाराम बाबुराव घोडेकर यांनी आपल्या सुनेविरुद्धफिर्याद नोंदवली आहे. सून माया घोडेकर व मुलगा गणेश घोडेकर या दोघांमध्ये लग्न झाल्यानंतर सातत्याने पैशाच्या कारणावरून व घरगुती कारणावरून वाद होत होते, गेल्या २ महिन्यापासून सून माया घोडेकर ही मुलगा गणेश याच्याकडे फारकत मागत होती. त्यामुळेच मुलगा गणेश याने पाझर तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. त्यानुसार पत्नी माया गणेश घोडेकर हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज राउत हे अधिक तपास करीत आहे.

Web Title: Sangamner case against his wife for jumping into a lake and committing suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here