Home अहिल्यानगर ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर साईच्या शिर्डीत हाय अलर्ट

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर साईच्या शिर्डीत हाय अलर्ट

Breaking News | Ahilyanagar: ख्यातीचे श्री साईबाबा मंदिर आणि साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले भाविकांची कसून तपासणी.

Sai Shirdi Hi Alert in the background of Operation Sindoor

शिर्डी : ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्री साईबाबा मंदिर आणि साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. शुक्रवारी सायंकाळी अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी पोलिस अधिकाऱ्यांसह साईबाबा मंदिर आणि शिर्डी विमानतळ या दोन्ही ठिकाणी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष तमने, पोलिस निरीक्षक रणजित गलांडे आणि मंदिर सुरक्षा प्रमुख सतीश गोटेकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. मंदिराच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांची तसेच स्थानिक नागरिकांची कसून तपासणी केली जात आहे. परिसरात येणाऱ्या ग्रामस्थांची आणि मंदिरातील कर्मचाऱ्यांची ओळख पटवून त्यांची नोंद ठेवण्यात येत आहे. यासोबतच मंदिरात आणले जाणारे फूल आणि प्रसादाचे साहित्यदेखील बारकाईने तपासले जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, दिवसभरात अनेक वेळा बॉम्बशोधक पथकाकडूनही मंदिराच्या परिसराची तपासणी केली जात आहे.

विमानतळावरही निरीक्षण

शिर्डी विमानतळावरही याच धर्तीवर सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून बारकाईने निरीक्षण केले जात आहे. अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी दोन्ही ठिकाणांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संवाद साधून आवश्यक सूचना दिल्या आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलिसांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कंबर कसली आहे.

Breaking News: Sai Shirdi Hi Alert in the background of Operation Sindoor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here