संगमनेर: प्रवरा नदीला पूर, हा पूल पाण्याखाली, मंदिराला पाण्याचा वेढा
Breaking News | Sangamner: भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने प्रवरा नदीला पूर.
संगमनेर: भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने प्रवरा नदीला पूर आला आहे. ओझर बुद्रुक व ओझर खुर्दला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे, तर श्री जगदंबा माता (जगुबाई) मंदिराला पाण्याने वेढले आहे.
दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने प्रवरा नदीला पूर आला आहे. ओझर बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात पाणी वाहत आहे. प्रवरा नदीपात्रात वाहत असलेल्या पाण्यामुळे ओझर बुद्रुक व ओझर खुर्दला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. हा पूल पाण्याखाली गेल्याने कनोली, कनकापूर, ओझर बुद्रुक या गावांचा आश्वी बुद्रुकचा संपर्क तुटला आहे. ग्रामस्थांना लांबचा मार्ग वापरावा लागत आहे. माता मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. ओझर बंधारा व जगुबाई मंदिर परिसरात निसर्ग सौंदर्य बहरले. असून ते पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. ही गर्दी हटविण्यासाठी प्रशासनाने आवाहन केले. दरम्यान सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
Web Title: River Pravara floods, bridge under water, temple surrounded by water
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study