Home संगमनेर रस्त्याच्या वादातून मारहाण; महिलेचा विनयभंग

रस्त्याच्या वादातून मारहाण; महिलेचा विनयभंग

संगमनेर: तालुक्यातील एका विवाहित महिलेला कोंबड्या व रस्त्याच्या वादातून दोघांनी गचांडी धरत धक्काबुक्की करून त्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना रविवार दि. २३ जून रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही विवाहित महिला आपल्या कुटुंबासोबत रहात आहे. सदरची महिला रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेतात जात असताना भागवत भाऊसाहेब डोमाळे व भाऊसाहेब भागा डोमाळे हे दोघेजण पाठीमागून त्यांच्या शेतात जात असताना त्याचवेळी महिलेने त्यांना विचारले की, तुम्ही माझ्या सासूला शिवीगाळ का केली? त्यावर त्या दोघांनाही तुम्ही सामाईक रस्त्याचा वापर करायचा नाही, नाहीतर तुमचा जीव घेईन, असे म्हणत दोघांनीही महिलेची गचांडी धरून धक्काबुक्की करत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून महिलेचा विनयभंग केला. तसेच कोणाला काही सांगीतल्यास तुला जीवे मारून टाकू, अशी धमकीही त्यांनी दिली आहे.

 याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी भागवत डोमाळे व भाऊसाहेब डोमाळे या दोघांविरुद्ध गु. र. नं. १६६/२०१९ भा. दं. वि. कलम ३५४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश टकले हे करीत आहेत.

Website Title:Ridiculing The Road Controversy; Molestation Of Woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here