Home अकोले निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nilwande Dam: निळवंडे सिंचन प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव.

Revised administrative approval for Nilwande project

मुंबई:  अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या गोदावरी आहेत. त्याचबरोबर या प्रकल्पासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता दिली जाईल, असे फडणवीस यांनी याबाबत मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी निळवंडे, कुकडी सिंचन प्रकल्प आणि गोदावरी कालवा प्रकल्पांच्या कालवा प्रकल्पांच्या कामाबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला खासदार सुजय विखे पाटील, दिल्या. खासदार सदाशिव लोखंडे, आमदार बबनराव पाचपुते, शिवाजीराव कर्डिले, जलसंपदा विभागाचे सचिव राजन शहा, सचिव विलास राजपूत आदी उपस्थित होते.

गोदावरी कालवा प्रकल्पांच्या उर्वरित कामांना प्रशासकीय मान्यता द्यावी, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.  बैठकीस जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अतुल कपोले, नाशिक विभागाचे मुख्य अभियंता संजय बेलसरे, पुणे विभाग मुख्य अभियंता हणमंत धुमाळ उपस्थित होते.

विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊ

निळवंडे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील वितरण प्रणालीचे काम बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे प्रस्तावित आहे. मात्र, राहुरी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी त्याला विरोध केल्याचे बैठकीत सांगण्यात आले. याबाबत शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: Revised administrative approval for Nilwande project

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here