अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून वारंवार बलात्कार, कपडे बदलत असताना…
Rape Case: कपडे बदलत असताना घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार.
पुणे: पुणे येथील गुलटेकडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर शेजाऱ्याने वारंवार बलात्कार (Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत मुलीच्या वडिलानी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, 19 फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी तिच्या शाळेत शिवजयंतीनिमित्त आयोजित नाटकात सहभागी झाली होती. जेव्हा ती घरी परतली आणि कपडे बदलत होती, तेव्हा आरोपी तिच्या घरात घुसला आणि धमकावून (threaten) तिच्यावर बलात्कार केला, असे फिर्यादीत म्हंटले आहे. अपहरण (kidnap) करुन पीडितेला मुंबईमध्ये ठेवल्याची धक्कादायक बाब देखील उघडकीस आली आहे.
त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार तिच्यावर बलात्कार केला. जुलै महिन्यात आरोपी आणि त्याच्या मित्राने बळजबरीने तिचे अपहरण करून तिला मुंबईत ठेवले. पोलिसांनी मुलांवर लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मुलगी घरी परतल्यानंतर पोलिसांनी तिची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. तेव्हा तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले. तपासात सहा महिन्यांपूर्वी महेश मोरेने बलात्कार केल्याचे तिने सांगितले. तक्रारीत म्हटलं आहे की, मुलगी शाळेतून घरी आली होती. त्या वेळी घरात कोणी नसल्याचे पाहून महेश मोरेने मुलीवर अत्याचार केले. या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. वैद्यकीय तपासणीत मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास स्वारगेट पोलिस करत आहेत.
Web Title: Repeated rape of a minor girl by a neighbor