रेखा जरे प्रकरण: बालविकास अधिकारी विजयामाला माने यांच्या जीविताला धोका
अहमदनगर | Rekha Jare Murder Case: रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील बालविकास प्रकल्प अधिकारी विजयामाला माने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने त्यांना आरोपींपासून जीविताला धोका असल्याचे सांगत त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
रेखा जरे यांची सोमवारी ३० नोव्हेंबरला रात्री हत्या करण्यात करण्यात आली होती. त्यांच्यासोबत माने या कारमध्ये होत्या. त्यांनी हे हत्याकांड प्रत्यक्ष पाहिले आहे. घटना घडल्यानंतर माने यांनीच जारे यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. रेखा जरे यांच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष साक्षीदार असल्याने माझ्या जीवितास यामधील आरोपीपासून धोका असल्याचे माने यांनी सांगितले. रविवारी माने यांनी पोलिसांसमोर जबाब दिला आहे.
मी सरकारी साक्षीदार असल्याने मला संरक्षण मिळावे अशी मागणी पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. हा हत्याकांड झाल्यानंतर माने यांचा पोलिसांशी संपर्क नव्हता अशी चर्चा होती. रेखा जरे यांचा खून मी प्रत्यक्ष पाहिला आहे. माझा रक्दाब वाढला होता, माझी आई सुधा घाबरून गेली होती. कामानिमित मी दोन दिवस बाहेर गावी गेले होते. मी पोलिसांच्या संपर्कात होते. मी फरार असल्याची चर्चा चुकीची असल्याची त्यांनी सांगितले. रविवारी तपास अधिकाऱ्यांकडे जबाब नोंदविला आहे.
Web Title: Rekha Jare Murder CaseJayamala Mane’s life in danger