शारीरिक संबंधाला नकार , आधी खून केला, नंतर मृतदेहावर बलात्कार, धक्कादायक घटना.
Nagpur Crime: विवाहित महिलेच्या मारेकऱ्याला पोलिसांनी गजाआड केले आहे. तपासात आरोपीने आधी गळा दाबून महिलेचा खून केला. तिचे कपडे काढून मृतदेहावर बलात्कार केला. त्यानंतर महिलेला कपडे घालून फरार झाल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले. रोहित गणेश टेकाम (वय २५, रा. पारशिवनी) असे आरोपीचे नाव आहे.
नागपुर: नागपूरच्या हुडेकेश्वरमधील विवाहितेच्या हत्येसंबंधी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आरोपीने महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेहावरही अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. विवाहित प्रेयसीने शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळे प्रियकराने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहावर अत्याचार केला. महिलेची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर हे धक्कायक कृत्य उघडकीस आले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळची मध्यप्रदेशातील 32 वर्षीय संजना नावाची विवाहिता सहा वर्षांपूर्वी कामाच्या शोधात आपल्या पतीसह नागपुरात आली होती. तिला एक मुलगी आहे. तिचा पती एका ढाब्यावर कामाला आहे. तो सकाळी कामाला गेली की मध्यरात्री एक वाजता घरी येते. संजनाला दारुचे व्यसन होते. रोहित टेकाम हा बांधकाम मिस्त्री असून दोन वर्षांपूर्वी तो हुडकेश्वर खुर्द येथील एका इमारतीच्या बांधकामावर होता. तेव्हाच संजना आणि रोहितची ओळख झाली.
संजना आणि रोहित टेकाम या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पती घरी नसताना रोहित नेहमी तिला भेटायला येत होता. गुरुवारी पती कामावर गेल्यानंतर संजनाने रोहितला घरी बोलावले. तिने दारुची बाटली आणण्यास सांगितले. दोघे जण दारु प्यायले. नंतर रोहितने संजनाकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने त्याला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या रोहितने दारुच्या नशेत त्याने तिला मारहाण केली. तरीही तिने संबंधासाठी नकार दिला. शेवटी रोहितने तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळला आणि खून केला. आरोपीचे एवढ्यावर समाधान झाले नाही. त्याने संजनाच्या मृतदेहावर बलात्कार केला आणि पळ काढला.
सायंकाळी संजनाची मुलगी घरी आली. तिला आई बेशुद्धावस्थेत दिसली. मुलीने वडिलांना माहिती दिली. तिचे वडील घरी आले व पत्नीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. ती शुद्धीवर आली नाही. तिचा मृत्यू झाल्याचे समजताच पतीने शेजाऱ्यांना माहिती दिली. एकाने हुडकेश्वर पोलिसांना कळविले माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भदोडकर यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.
पोलिसांनी कसून चौकशी केली. संजनाच्या मोबाइलचे कॉल डिटेल्स व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तीन संशयितांना ताब्यात घेतले. कसून चौकशीदरम्यान रोहितने खून केल्यानंतर बलात्कार केल्याचे मान्य केले. पोलिसांनी त्याला अटक केली. वैद्यकीय अहवालातून मृतदेहावार बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले.
Web Title: Refusal of physical intercourse, first killed, then raped the body
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News