जिल्ह्यातील या बँकेवर आरबीआयकडून निर्बंध फक्त १० हजार रुपये काढता येतील
अहमदनगर | Ahmednagar: नगर अर्बन बँकेची नुकतीच निवडणूक होऊन नव्याने पदाधिकारी आणि संचालक मंडळ अस्तित्वात आलेल्या बँकेवर आरबीआयने पुढील सहा महिन्यांत निर्बंध आणले आहेत.
या कालावधीत सभासदांना दहा हजारांच्या पेक्षा अधिक ठेवी काढता येणार नसून बँकेला नव्याने कर्ज वाटप अथवा ठेवी देखील स्वीकारता येणार नाही. बँकेची आर्थिक घडी बसविण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे आरबीआयच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
नगर अर्बन बँक लिमिटेडला जनतेच्या माहितीसाठी आयबीआयकडून सूचित करण्यात आले आहे. यात बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 च्या कलम 56 सह वाचलेल्या कलम 35 च्या पोटकलम (1) अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करताना भारतीय रिझर्व्ह बँकेने अर्बन बँकेला 6 डिसेंबरला बँकेचा व्यवसाय बंद झाल्यापासून पूर्व परवानगी शिवाय लिखित स्वरूपात कोणतेही कर्ज आणि अग्रीम अनुदान किंवा नूतनीकरण, कोणतीही गुंतवणूक, निधीची उधार घेणे आणि नवीन ठेवी स्वीकारणे यासह कोणतेही दायित्व स्वीकारने आणि दायित्वे पूर्ण, तसेच आरबीआय निर्देशांनुसार अधिसूचित केल्याशिवाय त्याच्या कोणत्याही मालमत्ता किंवा मालमत्तेची व्यवस्था आणि विक्री, हस्तांतरण किंवा अन्यथा विल्हेवाट लावणे, विशेषतः नमूद केलेल्या अटींच्या अधीन राहून बँकेतील चालू खाती किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील शिल्लक रकमेच्या केवळ दहा हजार रुपये काढता येणार आहे. आरबीआयचे हे आदेश म्हणजे अर्बन बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला असे समजू नये. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवेल. रिझर्व्ह बँक परिस्थितीनुसार या निर्देशांमध्ये बदल करण्याचा विचार करू शकते.
Web Title: RBI restrictsNagar Arban bank in Ahmednagar