Rape Case | पतीला सेल्फी पाठविण्याची धमकी देत बलात्कार
नाशिक: नाशिक येथील विवाहीतेशी सोशियल मेडियाच्या माध्यमातून मैत्री करून बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या एका विवाहितेची १८ ते २८ डिसेंबर २०२१ च्या दरम्यान सोशियल मेडीयाच्या माध्यमातून एका तरूणाबरोबर ओळख झाली. ओळखीतून दोघांचे मैत्रीत रुपांतर झाली. तरुणाने विवाहीतेशी संवाद साधत बोलणं वाढवलं. नंतर विवाहितेला भेटायला बोलाविले. पर्यटनाच्या नावाखाली शिर्डी, वणी आदि ठिकाणी फिरविले. या दौऱ्यात त्याने अनेक फोटो काढले. त्याच्यासोबत सेल्फीही काढली. नेमकी याचाच फायदा घेत या तरुणाने फोटोचा हत्यार म्हणून वापर केला. हे सेल्फी तुझ्या पतीला पाठवितो अशी धमकी विवाहितेला दिली. त्याने तिला बोलावून घेत तिच्यावर विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केला. तसेच याची वाच्यता केल्यास धमकी धमकी दिली. संशियीत तरुण मुंबईचा असल्याचे समजते. त्रास जास्त वाढल्याने विवाहितेने अखेर भद्रकाली पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद नोंदवली. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पी. डी. पवार हे करीत आहे.
Web Title: Rape threatening to send selfie to husband