Rape Case: दुधात गुंगीच्या गोळ्या टाकून विवाहितेवर बलात्कार
Jalgaon Crime: एका विवाहीतेवर दुधात औषध मिसळून झोपेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल.
जळगाव: घरकाम करणा-या हरिविठ्ठल नगर भागातील एका विवाहीतेवर दुधात औषध मिसळून झोपेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव शहराच्या हरिविठ्ठल या उपनगरातील एका विवाहितेची पाचोरा तालुक्यातील जयदीप पाटील नावाच्या तरुणासोबत ओळख होती. त्याने गरम दुधात गोळ्या टाकून ते दूध तिला पिण्यास दिले. तिला गुंगी आल्यानंतर त्याने तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापीत केले. ज्यावेळी हा प्रकार तिच्या लक्षात आला त्यावेळी तिने त्याला जाब विचारला. तु जर हा प्रकार तुझ्या पतीला सांगितला तर तुझा मर्डर करेन अशी त्याने तिला धमकी दिली.
त्यानंतर गेल्या एक वर्षांहून अधिकच्या कालावधीपासून तो तिच्यासंक्षित वेळोवेळी लैंगिक अत्याचार आणी मारठोक करत राहिला. संशयीत आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रोहीदास गभाले करत आहेत.
Web Title: Rape of married woman by putting gungy pills in Milk
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App