Rape | डेटिंग अॅपच्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार
Pune Crime | पुणे: काही दिवसांपूर्वी दोघांची एका डेटिंग अॅप च्या माध्यमातून ओळख झाली. दोघांमध्ये संवाद वाढत गेला. याच ओळखीचा फायदा घेत एकाने एका तरुणीला जेजुरीला नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार ( Rape) केला. तसेच या प्रकाराबाबत कुणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली आहे.
याप्रकरणी पिडीत तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मह्नेद्र उर्फ रावसाहेब भानुदास गायकवाड वय ४२ रा. मांजराईनगर पुणे, संतोष पाटील वय ४० रा. चिखली पुणे या दोन आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून हे दोन्ही आरोपी फरार आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र गायकवाडने फिर्यादीला त्याच्या मित्राकडे नेत त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला.
Web Title: Rape of a young woman through the introduction of a dating app