Home अहमदनगर अहमदनगर: घरात घुसून महिलेचा विनयभंग

अहमदनगर: घरात घुसून महिलेचा विनयभंग

Ahmednagar | Rahuri: एकटी असलेल्या महिलेच्या घरात बेकायदेशीररीत्या प्रवेश करून तिचा विनयभंग (Molested).

Molested of a woman by breaking into the house

राहुरी : एकटी असलेल्या महिलेच्या घरात बेकायदेशीररीत्या प्रवेश करून तिचा विनयभंग करण्यात आला. तसेच दोघी सासू-सुनेला लाथाबुक्क्यांनी लोखंडी चेन व काठीने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यात दि. ६ डिसेंबर रोजी घडली.

घटनेतील ३७ वर्षीय महिला घरात असताना सहाजणांनी तिच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. तिच्या अंगाला झटून तिचा विनयभंग करण्यात आला. त्यावेळी आरोपींनी महिलेला व तिच्या सासूला मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत सासू व सून या जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संदीप शहाजी बलमे, नानासाहेब शहाजी बलमे, सुमन नानासाहेब बलमे, कल्पना संदीप बलमे, जनाबाई शहाजी बलमे, सागर नानासाहेब बलमे, सर्व राहणार वडनेर, ता. राहुरी. या सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Molested of a woman by breaking into the house

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here