शेतात बैल चारायला घेऊन गेलेल्या महिलेवर बलात्कार आणि निर्घुण हत्या
Amaravati Rape and Murder: दोघांतील वादविवादातून महिलेवर बलात्कार करून दगडाने ठेचून हत्या.
अमरावती: जिल्ह्यात धारणी तालुक्यात खळबळजनक घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. दोघांतील वादविवादातून महिलेवर बलात्कार करून दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बिरोटी गावात शेतीच्या धुऱ्यावर बैल चारण्यासाठी आलेल्या महिलेसोबत एका तरुणाने वादविवाद केला. दोघांमधील वाद वाढल्याने तरुणाने महिलेवर बलात्कार (Rape) करून तिची हत्या केली. पीडित महिलेवर तरुणाने अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या (Murder) केल्याच्या धक्कादायक घटना घडली. या गंभीर प्रकाराबाबत सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सचिन उर्फ रम्मू दारसींभे (२६) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमरावतीच्या धारणी तालुक्यात एका तरुणाने महिलेवर बलात्कार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गंभीर प्रकारामुळं अमरावती जिल्हा हादरला आहे. शेतात बैल चरायला घेवून आलेल्या महिलेसोबत एका तरुणाने अतिप्रसंग करून तिची खून (Murder) केला. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची तातडीनं दखल घेवून आरोपीला अटक (Arrested) केली आहे.
Web Title: Rape and brutal murder of a woman who was taking bulls to graze in the field