आईंच्या प्रियकराकडून मुलीवर अत्याचार
नेवासा | Rape: नेवासा तालुक्यात एका गावात आईच्या प्रियकराकडून मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दिनांक ११ रोजी घडली असून याबाबत मुलीच्या आईने नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीत महिनेने गेल्या १० वर्षापूर्वी तिच्या पतीला सोडचिट्ठी दिली आहे. त्यावेळी तिला एका मुलगी होती. त्यानंतर त्या महिलेचे तीन वर्षानंतर एका व्यक्तीशी प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर महिलेला मुलगा झाला असे महिलेने फिर्यादीत म्हंटले आहे. गुरुवारी दिनांक ११ रोजी संध्याकाळी सात वाजता कामावरून घरी आल्यानंतर मुलीने त्याच्याविषयी तक्रार केली. ते जवळ येऊन मिठी मारतात असे मुलीने आईला सांगितले. त्यानंतर महिलेने प्रियकरास समजावून सांगितले. गुरुवारी रात्री जेवण करून झोपल्यानंतर महिलेच्या प्रियकराने मुलीवर ११ वाजेच्या सुमारास अत्याचार केला. मुलीने घडलेला प्रकार सकाळी आईला सांगितला असे फिर्यादीत म्हंटले आहे. मुलीच्या आईने याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Web Title: Rape Abuse of daughter by mother’s lover