लग्न होणार असल्याचा फायदा घेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तुमच्या मुलीला मदतीस पाठवता का….
Ahmednagar News: होणार असल्याचा फायदा घेत एका अल्पवयीन मुलीवर तरुणाने वेळोवेळी अत्याचार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
अहमदनगर: 18 वर्षे पूर्ण झाल्यावर लग्न होणार असल्याचा फायदा घेत एका अल्पवयीन मुलीवर तरुणाने वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नगर शहरात राहणार्या पीडित अल्पवयीन मुलीने रविवारी (दि. 14 ) कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाविरूध्द अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम जालिंदर मेहेर (रा. पारनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदरचा गुन्हा तपासकामी पारनेर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. नगर शहरात राहणारी पीडित अल्पवयीन मुलगी (वय 15) सध्या दहावीमध्ये शिक्षण घेते. सुमारे एक वर्षापूर्वी ठरले होते की, 18 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर शुभम व फिर्यादी मुलीचे लग्न लावून द्यायचे. दरम्यान ऑगस्ट 2022 मध्ये शुभमच्या आईने फिर्यादी मुलीच्या आईला फोन करून सांगितले की, मी गाडीवरून पडल्याने मला कमरेला जबर मार लागलेला आहे.
त्यामुळे मला घरातील काम व स्वयंपाक करता येत नाही, तरी मला बरे वाटेपर्यंत चार पाच दिवस तुमच्या मुलीला मदतीस पाठवता का, असे म्हणाल्यानंतर फिर्यादीच्या आईने फिर्यादीला शुभमसोबत त्यांच्या घरी पाठविले. दरम्यान फिर्यादी तेथे असल्यानंतर शुभमने आपले लग्न होणारच आहे, असे म्हणून वेळोवेळी शारीरीक संबंध प्रस्थापीत केले. सदरचा प्रकाराबाबत कोणास काही एक सांगितले तर मी तुला जिवंत सोडणार नाही. तुला मारून टाकीन असे म्हणून धमकी दिली. सदर बाबत तू कोठेही वाच्यता केल्यास मी तुझी बदनामी करीन व तुला सोडणार नाही, असे म्हणाल्याने फिर्यादी घाबरली त्यामुळे तिने सदरचा प्रकार घरी सांगितला नाही.
परंतु शुभम हा नेहमी नगरमध्ये यायचा व फिर्यादीला फोन करायचा व भेटण्यासाठी बोलवायचा. नकार दिल्यास, तु जर मला भेटण्यासाठी आली नाही तर मी सदर बाबत सर्वांना सांगेन व तुझी बदनामी करेन तसेच तुझे घरच्यांना मारून टाकेन, असे बोलून धमकावयाचा. त्याचे भितीपोटी फिर्यादी त्यास भेटण्यासाठी जात असे. परंतु तो दिवसेंदिवस जास्त त्रास देऊ लागल्याने फिर्यादीने सदर बाबत आईस घडलेला सर्व प्रकार सांगितला त्यानंतर शुभम विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Rape of a minor girl taking advantage of marriage
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App