अश्लिल चाळे सुरू असलेल्या सहा कॅफेंवर छापे
Breaking News | Ahmednagar: शहरासह उपनगरातील लव्हबर्डस, बजाज, झेड. के. सह सहा कॅफेवर सोमवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकत सात जणांवर गुन्हे दाखल.
अहमदनगर: शहरासह उपनगरातील लव्हबर्डस, बजाज, झेड. के. सह सहा कॅफेवर सोमवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकत सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच कॅफेतील तरुण-तरुणींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
तरुण-तरुणींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या नगर शहरातील सहा कॅफेंवर सोमवारी (दि. ८) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापे टाकले, कॅफे चालविणाऱ्या सहा जणांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कॅफे संदर्भात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना कारबाईचे आदेश दिले होते. निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, सोपान गोरे, अंमलदार अतुल लोटके, सागर ससाणे, अमृत आढाव, रवींद्र घुगासे, बाळासाहेब गुंजाळ, जालिंदर माने, भाग्यश्री भिटे, सोनाली साठे, उमाकांत गावडे, अरूण मोरे यांची दोन पथके तयार करण्यात आली. या पथकाने सहा कॅफेंवर कारवाई केली. सावेडी उपनगरातील श्रीराम चौकातील लव्ह बर्डस कॅफे, कुष्ठधाम रस्त्यावरील बाबाज कॅफे, गुलमोहर रस्त्यावरील हर्षाज कॅफे, नगर मनमाड रस्त्यावरील कोहिनुर मॉल समोरील झेड के कॅफे, बुरूडगाव रस्त्यावरील गोल्डरश कॅफे व चाणक्य चौकातील रिजकिंग कॅफेवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी महेश मच्छिंद्र तेलोरे, ऋषीकेश सखाराम निर्मळ, रोहित कुमार साठे, हर्षवर्धन भाऊसाहेब काकडे, सागर अशोक उदमले, रवी रघुनाथ चौरे, अर्जुन ईश्वर कचरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कॅफेमध्ये मिळून आलेल्या तरुण मुला मुलींच्या पालकांना बोलावून त्यांच्या समक्ष समज देवून ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती, अशी शहरासह उपनगरात कोणतीही परवानगी न घेता कॅफे चालविले जात असून, तरुण- तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आतील बाजूस पडदे लावून मुले व मुली आक्षेपार्ह वर्तन करतअसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने दोन पथकांची नेमणूक करत अत्यंत गोपनियरीत्या कॅफेवर छापे टाकले. त्यावेळी या कॅफेमध्ये काही तरुण- तरुणी आढळून आल्या असून, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या पालकांना बोलावून समज देण्यात आली.
Web Title: Raids on six cafes where obscene chale is going on
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News