Home अहमदनगर शिर्डीत वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या हॉटेलवर छापा, तीन मुलींची सुटका, एकास अटक

शिर्डीत वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या हॉटेलवर छापा, तीन मुलींची सुटका, एकास अटक

Breaking News | Shirdi:  हॉटेल वसंत विहारमध्ये वेश्या व्यवसाय (Prostitution) चालविणाऱ्या एका तरुणाला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले.

raid on a hotel running a prostitution business in Shirdi, three girls were rescued

शिर्डी: शिर्डी शहरातील पालखी रोडवरील हॉटेल वसंत विहारमध्ये वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या एका तरुणाला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे.

गुप्त माहितीच्या आधारावर शिर्डी पोलिसांनी हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला. यावेळी आरोपीने ग्राहकास पैशाच्या बदल्यात मुलींचा गैरवापर करण्याची ऑफर दिली. यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपीला अटक केली आणि मुलींची सुटका केली.

वेश्या व्यवसाय चालवणारा आदमाने (वैजापूर) या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. तर या वेश्या व्यवसायाचा मुख्य सूत्रधार नाना हा पसार झाला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक कायंदे, पोलिस हेडकॉन्स्टेबल इरफान शेख, अशोक शिंदे, दत्ता तेलोरे, बाबा खेडकर, गणेश घुले, श्याम जाधव, सविता भांगरे, पवार, गोलवड, ज्ञानेश्वर गांगुर्डे यांच्या पथकाने केली.

याप्रकरणी शिर्डी पोलिस स्टेशनमध्ये महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल सविता भांगरे यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ कलम ३, ४, ५, ७, ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: raid on a hotel running a prostitution business in Shirdi, three girls were rescued

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here