कालव्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
राहता | Rahata: राहता तालुक्यातील राजुरी येथे प्रवरा डाव्या कालव्यात तरुण पडल्याने बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुनील सिताराम पंडित असे या मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुनील पंडित हे दुपारच्या सुमारास कालव्याकडे गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते अचानक पाण्यात बुडाले. ही बाब तेथे आजूबाजूच्या परिसरात धुणे धुणाऱ्या महिलांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यानी पाहताच आरडाओरडा केला त्यावेळी काही युवकांनी कालव्याकडे धाव घेत या तरुणाचा शोध घेतला मात्र त्याचा मृतदेह दगडाला अडकलेला आढळला असता पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यांना प्रवरा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती राजुरीचे पोलीस पाटील रावसाहेब गोरे यांनी लोणी पोलीस स्टेशनला दिली. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Rahata unfortunate death of a young man drowning in a canal