Home राहाता Rahata: राहत्यात एका करोनाबाधीताचा मृत्यू

Rahata: राहत्यात एका करोनाबाधीताचा मृत्यू

Rahata Corona one death

राहता(Rahata): राहता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथील ९० करोनाबाधित वृद्धाचा मंगळवारी एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. कोल्हार भगवतीपूर येथे करोनाचा पहिला बळी गेला आहे.

कोल्हार भगवतीपूर लोणी रस्त्यावर भगवतीपूर येथील एका वस्तीवर दोन कुटुंबातील व त्यांच्या संपर्कातील १३ जणांना करोनाची लागण झाली आहे. सोमवारी त्यात आणखी दोन आढळून आले आहेत. त्यामुळे या वस्तीवरील करोनाबाधितांची संख्या १५ झाली आहे. हे ठिकाण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

या वस्तीवर सर्वात प्रथम एका ९० वर्षीय वृद्धास करोनाची लागण झाली होती. या वृद्धावर अहमदनगर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना मंगळवारी या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. कोल्हार भगवतीपूर येथे करोनाचा पहिला मृत्यू झाला आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Rahata Corona one death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here