अहमदनगर: बिबट्याचा चिमुरड्यावर हल्ला
राहाता | Rahata: राहता तालुक्यात पिंपरी लोकई या गावात घरा जवळील शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या वडिलांच्या मागे मागे आलेल्या एका सहा वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मुलगा जखमी झाला आहे. काल सायंकाळी सहा वाजेनंतर ही घटना घडली आहे. या घटनेने ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जनार्दन बाळासाहेब गाडेकर (वय 6) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. त्याच्या डोक्याला मोठी जखम झाली आहे. त्यास प्रथम केलवड येथील एका खाजगी दवाखान्यात नेले होते. परंतु जखमेचे स्वरुप पाहता त्यास लोणी येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्याच्या मानेवरही जखम झाली आहे. आपले अपंग असलेले वडील घरापासून 100 ते 150 फूट अंतरावर असलेल्या शेतात स्प्रिंकलरचे पाईप बदलण्यासाठी चालले, हे पाहून जनार्दन हा सहा वर्षांचा चिमुरडा वडिलांच्या नकळत त्यांच्या मागे मागे चालू लागला. वडील पाईप बदलत असताना अचानक त्यांच्या मागे उभ्या असलेल्या जनार्दनवर गिन्नी गवतातून आलेल्या बिबट्याने हल्ला केला. हल्ला होताच जनार्दन जिवाच्या आकांताने ओरडला. त्याच्या वडिलांच्या लक्षात चटकन ही बाब येताच त्यांनीही आरडाओरड केली. आजुबाजुचे रहिवाशी ओरडल्याने बिबट्याने काही वेळातच तेथुन धूम ठोकली.
We Title: Rahata Bibatya attacks Chimurda