मद्यपी तरूणाची दुसर्या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक
राहता | Accident: साकुरी-शिर्डी रस्त्यावर साईदत्त ट्रेडर्स समोर मद्यपी तरुणाची शेतकऱ्याच्या मोटारसायकलला अपघात घडला आहे. मद्यपी तरूणाने सुसाट वेगाने मोटारसायकल चालवत रस्त्याच्या कडेने जाणार्या दुसर्या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक देत तेथून पळ काढला. अपघात झालेल्या व्यक्तीस मदत करण्याऐवजी तेथून पळ काढला. हा अपघाताचा हा प्रसंग पाठीमागे असलेल्या एकाने मोबाइल कॅमेर्यात कैद केला असून तो सोशल मिडीयावर व्हायरल केला.
मोटारसायकल अपघाताचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यात एक मद्यपी तरूण सुसाट वेगाने मोटारसायकल चालवत असून काही अंतर पुढे गेल्यानंतर एका मोटारसायकला पाठीमागून जोराची धडक देताना दिसत आहे. मोटारसायकलवर शेतमाल घेऊन जाणार्या शेतकर्यास मद्यपी तरूणाने जोराची धडक दिली. शेतकरी मोटार सायकलवरून खाली पडला तर मोटारसायकल रस्त्याच्या कडेला पडली होती. सुदैवाने रस्त्याच्या कडेला असलेल्या माल वाहतुक टेंम्पोवर तो आदळला नाही.अन्यथा शेतकर्यास गंभीर दुखापत झाली असती. या अपघातानंतर मद्यपी बाईकस्वाराने तेथून पळ काढला.
Web Title: Rahata Accident youth hit another motorcycle from behind