धक्कादायक: एकतर्फी प्रेमातून वर्गात घुसून १०वीच्या विद्यार्थिनीवर चाकूने सपासप वार
पुणे | Pune Crime: पुण्यातील वडगाव शेरी परिसरात दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. एका शाळेमध्ये निरोप समारंभ सुरु असताना एका माथेफिरू तरुणाने वर्गात घुसून एका विद्यार्थिनीवर चाकूने सपासप वार केले. या घटनेने शाळेत खळबळ उडाली.
सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी तरुण हातात चाकू घेऊन विद्यार्थिनीच्या दहावीच्या वर्गात घुसला आणि इतर विद्यार्थ्यांच्या समोरच या मुलीवर सपासप वार केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
दरम्यान वडगाव शेरी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शाळेच्या आवारातच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. येरवडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पीडित मुलगी शाळेत असताना आरोपीने शाळेत जाऊन हत्याराने तिच्यावर वार केले. या हल्ल्यात विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर वडगाव शेरी येथील सिटी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. या घटनेचा अधिक तपास येरवडा पोलिस करत आहे.
Web Title: Pune Crime classroom and stabbed the 10th class student