बकरी ईदची बुधवारची सार्वजनिक सुट्टी रद्द, शासनाकडून नवीन निर्णय जाहीर
बकरी ईदचा सण गुरुवार, २९ जून रोजी येत असल्याने २८ जूनला देण्यात आलेली सुट्टी (Holiday Canceled) रद्द.
Holiday GR: बकरी ईदच्या बुधवारी मिळालेल्या सुट्टीनुसार तुम्ही प्लानिंग करत असाल तर थोडे थांबा. कारण बकरी ईदनिमित्त बुधवारी मिळणारी सुट्टी आता रद्द करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाकडून यासंदर्भात नवा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
बकरी ईदनिमित्त महाराष्ट्र शासनाकडून बुधवार, २८ जून रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. बकरी ईदचा सण गुरुवार, २९ जून रोजी येत असल्याने २८ जूनला देण्यात आलेली सुट्टी रद्द करण्यात आली आहे. शासनाकडून यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी असणारी सुट्टी आता गुरुवारी मिळणार आहे.
Web Title: Public holiday of Bakri Eid was canceled on Wednesday
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App