शेगावमध्ये सुरु होता देहविक्री व्यवसाय, पोलीस पथकाने छापा टाकला
Breaking News | Prostitution: उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या कॉलनीत देहव्यापार सुरु असल्याचे दिसून आले.
बुलढाणा : शेगाव शहरामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या कॉलनीत देहव्यापार सुरु असल्याचे दिसून आले. या देहव्यापार सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. या धडक कारवाईमध्ये एकास अटक केली. ही कारवाई ३ मे रोजी शेगाव शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता, तेथे काही महिला आणि एक इसम आढळून आला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सदर इसम हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त केले. त्याबदल्यात तो स्वतः आर्थिक व्यवहार करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कुणाल जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी विजय चंडाले याच्याविरुद्ध कलम ३, ४, ५ अनैतिक देहव्यवसाय प्रतिबंधक अधिनियम, १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील करीत आहेत. शहरातील प्रतिष्ठित कॉलनीमध्ये असे गैरकृत्य सुरु असल्याचे उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, पोलिसांनी अशा प्रकारांवर कारवाईची मागणी केली आहे.
Breaking News: Prostitution business, police raid, Takla