Home औरंगाबाद पश्चिम बंगालच्या महिलांना आणून देहविक्री व्यवसाय, पाच जण ताब्यात

पश्चिम बंगालच्या महिलांना आणून देहविक्री व्यवसाय, पाच जण ताब्यात

Breaking News | Chatrapati Sambhajinagar:  पश्चिम बंगालसह अन्य भागांतून महिलांना आणून सुरू केलेल्या देहविक्री व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. महिलांना डांबून वेश्या व्यवसाय सुरु. 

Prostitution business by bringing women from West Bengal, five arrested

छत्रपती संभाजीनगर: शहरातील पैठणगेटसारख्या गजबजलेल्या परिसरात पश्चिम बंगालसह अन्य भागांतून महिलांना आणून सुरू केलेल्या देहविक्री व्यवसायावर पोलिसांनी गुरुवारी (ता. २८) रात्री छापा मारला. या ठिकाणाहून दोन महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणात देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये संदीप भिकाजी खाजेकर (वय २४, रा. ता. गंगापूर), राजू सुभाष साळवे (वय २२, रा. नागसेननगर, उस्मानपुरा), विशाल सुरेश भुजंगे (वय ३०, रा. भीमनगर, भावसिंगपुरा), भावेश प्रवीण जाधव (वय २०, रा. रामनगर, हसूल), इरफान गफार देशमुख (वय २८, रा. बीड) यांचा समावेश आहे.

याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैठणगेट परिसरात असलेल्या अशोका हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांच्या पथकाने डमी ग्राहक पाठवून या ठिकाणी व्यवसाय होत असल्याबाबत खात्री केली. डमी ग्राहकाने इशारा करताच हॉटेलवर छापा मारण्यात आला.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये संदीप भिकाजी खाजेकर (वय २४, रा. ता. गंगापूर), राजू सुभाष साळवे (वय २२, रा. नागसेननगर, उस्मानपुरा), विशाल सुरेश भुजंगे (वय ३०, रा. भीमनगर, भावसिंगपुरा), भावेश प्रवीण जाधव (वय २०, रा. रामनगर, हर्सल), इरफान गफार देशमुख (वय २८, रा. बीड) यांचा समावेश आहे.

याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैठणगेट परिसरात असलेल्या अशोका हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांच्या पथकाने डमी ग्राहक पाठवून या ठिकाणी व्यवसाय होत असल्याबाबत खात्री केली. डमी ग्राहकाने इशारा करताच हॉटेलवर छापा मारण्यात आला.

Web Title: Prostitution business by bringing women from West Bengal, five arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here