अहिल्यानगर: प्राचार्याने विद्यार्थ्याचा केला अनैसर्गिक लैंगिक छळ, प्राचार्य पसार
Ahilyanagar Crime : प्राचार्याने आपल्याच विद्यालयात शिकत असलेल्या 9 वर्षाच्या विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक छळ केल्याचा प्रकार.
अहिल्यानगर: अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्राचार्याने आपल्याच विद्यालयात शिकत असलेल्या 9 वर्षाच्या विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक छळ केल्याचा प्रकार अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगरात घडला आहे. प्राचार्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच प्राचार्य फरार झाला आहे. संतोष देवरे असे प्राचार्याचे नाव असून त्याला पकडण्यासाठी तीन पोलीस पथके विविध जिल्ह्यात रवाना करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील केडगाव उपनगरातील एका प्राचार्याने आपल्याच विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा अनैसर्गिक लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी प्राचार्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, १०, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष देवरे या नराधमाने संबंधित विद्यार्थ्याला आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर वेळोवेळी अनैसर्गिक अत्याचार केले आहेत. गुन्हा दाखल होताच प्राचार्य संतोष देवरे फरार झाला असून त्याला पकडण्यासाठी तीन पोलीस पथके विविध जिल्ह्यात रवाना झाली आहेत. प्राचार्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
Web Title: Principal sexually molests student
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News