Home अकोले शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी साईचरणी लीन, निळवंडे धरण परिसरात ताफा

शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी साईचरणी लीन, निळवंडे धरण परिसरात ताफा

Shirdi Prime Minister Narendra Modi:  पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेऊन पूजा व आरती केली.

Shirdi Prime Minister Narendra Modi

शिर्डी:  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेऊन पूजा व आरती केली. यावेळी मंदिरात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य नेतेमंडळी उपस्थित होते. शिर्डीत पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

तसेच मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनदेखील त्यांच्या हस्ते पडणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजन करणार आहे.

त्यानंतर शिर्डी जवळील काकडी विमानतळ लगतच्या मोकळ्या मैदानात शेतकरी मेळाव्यात शेतकरी व नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी आरोग्य, रेल्वे, रस्ते, गॅस आणि तेल क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण ते करणार आहेत.

अपडेट: निळवंडे धरण डाव्या कालव्याचे लोकार्पण, मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण, मोदींकडून निळवंडे धरण परिसराची हवाई पाहणी, अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेले निळवंडे धरण, जल अर्पण करून धरणाच लोकार्पण, डाव्या कालव्याच पाणी शेतकऱ्यांना पंतप्रधान यांनी भेट दिली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने आज आनंदाचा दिवस, या धरणासाठी माजी मंत्री मधुकर, पिचड, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री राधाकृष्ण  विखे पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. 

Web Title: Shirdi Prime Minister Narendra Modi

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here