Home अहमदनगर पूजा खेडकर यांना नगरमधून दोनदा मिळाले दिव्यांग प्रमाणपत्र

पूजा खेडकर यांना नगरमधून दोनदा मिळाले दिव्यांग प्रमाणपत्र

Breaking News | Ahmednagar:  अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून नेत्र दिव्यांग व मानसिक आजारपणाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

Pooja Khedkar has twice received disability certificate from the city

अहमदनगर: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून नेत्र दिव्यांग व मानसिक आजारपणाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली.

खेडकर यांच्या कारनाम्यांची नवीन माहिती प्रत्येक दिवशी समोर येत आहे. अगोदर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील जावक नोंद वहीमध्ये खेडकर यांना प्रमाणपत्र वाटप केल्याची नोंद मिळाली होती. त्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने कागदपत्रांची तपासणी केली असता २०१८ मध्ये नेत्र दिव्यांग व २०२० मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिल्याची नोंद आढळून आली आहे. तत्कालीन वैद्यकीय मंडळाने २०२१ मध्ये दोन्ही एकत्रित करूनही प्रमाणपत्र दिल्याचे अभिलेखानुसार आढळून आले आहे, असे डॉ. घोगरे यांनी सांगितले. ज्या वैद्यकीय तपासण्यांच्या आधारे त्यांना ही प्रमाणपत्रे दिली त्या कागदपत्रांचा शोध सुरु आहे. खेडकर यांचे दिव्यांग प्रमाणपत्रासोबतच नॉन क्रिमीलेअर हे प्रमाणपत्र देखील संशयाचे फैन्यात अडकले आहे. त्यांनी एका मुलाखतीत आपले आईवडील विभक्त असल्याचा दावा केला होता. परंतु त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत अविभक्त कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. तसेच सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण ४० कोटींहून अधिक मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. परंतु नॉन क्रिमीलेअरसाठी उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांपेक्षा कमी आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांनी मिळवलेले नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रावर देखील प्रश्नचिन्ह आहे. यासंदर्भात, पाथर्डी विभागीय कार्यालयाकडून खेडकरांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.

दरम्यान मनोरमा व दिलीप खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल पुणे: पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांना पिस्तूल घेऊन धमकावत असल्याचा व्हिडीओ सोशल पीडियावर व्हायरल झाल्यानंतर शेतकयांनी शुक्रवारी रात्री पौड पोलिस ताण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर यांच्यासह चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Pooja Khedkar has twice received disability certificate from the city

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here