पोलीस कर्मचाऱ्याने संपविले जीवन, संशियीत पत्नीस अटक
Breaking News | Karmala: पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात जीवन संपविली असल्याची घटना.
करमाळा : करमाळा येथील पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी रात्री राहत्या घरात जीवन संपविली (Suicide) असल्याची घटना समोर आली आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आकाश गोते (वय 26) रा. मूळ घोळवेवाडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हल्ली मुक्काम करमाळा असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी मृत गोते यांच्या पत्नीसह एका पोलीस हवालदारा विरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वृत्त आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोते हे सहा महिन्यापूर्वी करमाळा येथे सोलापूरवरून बदली झाल्याने करमाळा पोलीस स्टेशन येथे आले होते. ते त्यांच्या पत्नीसह करमाळा येथे वास्तव्यास होते. त्यांची पत्नी ही करमाळा पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस कर्मचारी म्हणून कर्तव्यावर आहे. त्या कर्तव्यावर असताना आकाश तोगे यांनी त्यांच्या राहत्या घरी बुधवारी रात्री अज्ञात कारणाने जीवन संपवले, तोगे यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
त्यांच्या जीवन संपवण्याने मात्र करमाळा पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या पाठिमागील कारण अद्यापही अधिकृतपणे समजू शकले नाही. या प्रकरणी संशयित म्हणून महिला पोलीस कर्मचारी असलेल्या पत्नीस अटक करण्यात असून एक संशयित पोलिस फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
Web Title: Policeman ends his life, suspect’s wife arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study