पोलिस कर्मचार्याची गळफास घेऊन आत्महत्या
शिक्रापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचार्याने बुधवारी सायंकाळच्या सुमारास विहिरीच्या राहतात दोरीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या (Suicide).
Shirur News: शिरूर नजीकच्या नवले मळा येथे पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या शिक्रापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचार्याने बुधवारी सायंकाळच्या सुमारास विहिरीच्या राहतात दोरीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.
जितेंद्र उर्फ हरिभाऊ केशव मांडगे (34, रा. पिंपरी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचार्याचे नाव आहे.
मांडगे यांनी आत्महत्या करण्यापुर्वी एका नातेवाईकास कॉल करून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही वेळातच घटनास्थळी काहीजण गेले. तेथे त्यांना जितेंद्र मांडगे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. घटनास्थळी पोहचलेल्यांनी मांडगे यांना तात्काळ शिरूर येथील माणिकचंद हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी मांडगे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
मांडगे यांनी वैयक्तिक कारणातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास शिरूर पोलिस करीत आहेत.
Web Title: Policeman committed suicide by hanging himself
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App