Home संगमनेर संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावर पोलिसांच्या प्रयत्नामुळे चार लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त

संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावर पोलिसांच्या प्रयत्नामुळे चार लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त

Breaking News | Sangamner: बेकायदेशीरच्या गाईंची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून पोलिसांनी दोन गाईंना जीवदान दिल्याची घटना. एकूण चार लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त.

Police seize Rs 4 lakh 60 thousand worth of contraband

संगमनेर : बेकायदेशीरच्या गाईंची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून पोलिसांनी दोन गाईंना जीवदान दिल्याची घटना गुरुवार दि.२४ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील हरिबाबा देवस्थान समोर घडली. याप्रकरणी एक जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, कैलास भगवान गायकवाड, वय ४५ वर्षे, रा. लहवित जि. नाशिक हा गोवंश जातीची जनावरे निर्देयतेने व कुरतेने त्यांना अन्न व पाण्या विना पांढ-या रंगाचे टाटा कंपनीचे इन्द्रा वाहन क्रमांक एम. एच. १५ एच एच ५४१७ मधून वाहतूक करत होता. पोलिसांनी त्याला नाशिक-पुणे महामार्गावरील हरी बाबा जवळ पकडले.

पोलिसांनी सात हजार रुपये किमतीच्या दोन काळ्या तांबड्या रंगाच्या गायी व चार लाख रुपये किमतीचे टाटा कंपनीचे इन्द्रा वाहन असा एकूण चार लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल निशा घोडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी कैलास भगवान गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Breaking News: Police seize Rs 4 lakh 60 thousand worth of contraband

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here