अहिल्यानगर: शेतात गांजाच्या झाडांची लागवड, पोलिसांचा छापा
Breaking News | Ahilyanagar Crime: पोलिसांनी तेथे छापा (Raid) टाकत गांजाची लहान-मोठी 86 झाडे जप्त केली.

नगर: शेतात गांजाच्या झाडांची लागवड केल्याचा प्रकार अहिल्यानगर तालुक्यातील निमगाव वाघा शिवारात उघडकीस आला असून, पोलिसांनी तेथे छापा टाकत गांजाची लहान-मोठी 86 झाडे जप्त केली आहेत. ही लागवड करणारा गणेश हरिभाऊ पाचारणे (रा. नेप्ती, ता. नगर) याला पोलिसांनी अटक केली आहे.
निमगाव वाघा शिवारात एका व्यक्तीने शेतात गांजाची झाडे लावल्याची गोपनीय माहिती नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांना मिळाली होती.
त्यानंतर गिते यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक एकनाथ आव्हाड, पोलिस हेड कॉन्स्टेबल खंडेराव शिंदे, लाड, दाते, पोलिस कॉन्स्टेबल विक्रांत भालसिंग यांच्या पथकाने 3 सप्टेंबरला सायंकाळी त्या ठिकाणी छापा टाकून पाहणी केली असता शेतात लहान-मोठी 86 गांजाची झाडे लावलेली आढळून आली. हे शेत नेप्ती येथे राहणारा गणेश हरिभाऊ पाचारणे याचे असून, त्यानेच ही झाडे लावल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तसेच गांजाची 86 झाडे जप्त केली.
या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल खंडेराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचारणे याच्याविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एकनाथ आव्हाड करीत आहेत.
Breaking News: Police raid on cannabis plantation in field
















































