लग्नाचे आमिष देत संगमनेरातील पोलीसानेच केला महिलेवर अत्याचार
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यातील कार्यरत पोलीस नाईक याने विवाह जुळविण्यासाठी संकेतस्थळाचा वापर करीत एका घटस्फोटीत महिलेच्या झालेल्या ओळखीतून लग्नाचे आमिष देत अत्याचार केला. याप्रकरणी तो कार्यरत असणाऱ्या ठिकाणी घारगाव पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पोलीस कर्मचार्याने पिडीत महिलेच्या १० वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच या महिलेच्या इच्चेविरुद्ध दोनदा गर्भपात केला. गर्भपात करणारे डॉक्टर व इतर दोघेजण यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील यशवंत रत्नपारखी नेमणूक घारगाव पोलीस ठाणे संगमनेर असे या गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहें. डॉ. व्ही. जी. मेहेर निरामय हॉस्पिटल आळे ता. जुन्नर, अमोल कर्जुले व व त्याची आई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील रत्नपारखी हा घारगाव पोलीस ठाण्यात अंमलदार म्हणून कार्यरत आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी त्याचा विवाह जुळविण्यासाठी संकेत स्थळाचा वापर करीत सोलापूर जिल्ह्यातील एका घटस्फोटीत महिलेशी ओळख झाली. रत्नपारखी याने महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. ते एकमेकांना भेटले. काही महिने हे दोघे जण एकत्र राहिले. याचदरम्यान ही महिला हरोदर राहिली. या महिलेचा दोनदा गर्भपात करण्यात आला. तसेच पिडीत महिलेच्या अगोदर असलेल्या १० वर्षीय मुलीवरसुद्धा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पिडीत महिलेने तक्रार देण्यासाठी घारगाव पोलीस ठाण्यात पाठपुरावा केला मात्र दखल घेण्यात आली नाही. त्यांनतर सदर महिलेने अनिसच्या कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांच्याशी संपर्क करून त्यांनी हि बाब पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना सांगितली. यांनतर या महिलेची फिर्याद दाखल करून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले सर्व जण फरार आहेत. याप्रकरणी उप विभागीय पोलीस अधिकारी मदने हे अधिक तपास करीत आहेत.
Web Title: police in Sangamner tortured the woman by offering her marriage