अहिल्यानगर: कॅफेतील अश्लील चाळ्यांचा पोलिसांकडून पर्दाफाश
Breaking NEws | Ahilyanagar: नगरमध्ये पाच कॅफेवर छापा: कॅफेंमध्ये तरुण-तरुणींचे निव्वळ अश्लील चाळे , सात चालकांना केली अटक.
अहिल्यानगर : शहरात विविध ठिकाणी थाटण्यात आलेल्या कॅफेंमध्ये तरुण-तरुणींचे निव्वळ अश्लील चाळे चालत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी शहरातील पाच कॅफेंची तपासणी केली, तेव्हा ही बाब समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करत सात जणांना अटक केली आहे.
पथकाने नगर-कल्याण रोडवरील द परफेक्ट कॅफे, सारसनगर ते वाकोडी रोडलगत बेलाचाव कॅफे, सावेडी गावातील पंपींग स्टेशनजवळील ऑरिगेनो कॅफे, कोहिनूर मॉलजवळील डोडके कॅफे व स्टेट बैंक चौकातील वननेस कॅफे अशा पाच ठिकाणी पंचासमक्ष जाऊन खात्री केली असता, तरुण-तरुणी अश्लील चाळे करताना मिळून आले. पथकाने सदर कॅफे चालकांना कॅफे चालविण्याच्या परवान्याबाबत विचारपूस केली. त्यांनी कॉफी शॉपचा परवाना नसताना कॉफी शॉपचा बोर्ड लावून कुठलीही कॉफी, पेय अगर खाद्यपदार्थ विक्रीस न ठेवता आतमध्ये मुलामुलींना बसण्यासाठी व अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले.
यावेळी पोलिसांनी महेश पोपट खराडे (वय २३, रा.नालेगाव) आसिफ आयाज शेख (वय २६, रा. भोसले आखाडा, बुरूडगाव), विशाल विष्णू वाघ (वय १८ रा. बुरूडगाव रोड), मंगेश भरत आजबे (वय १९ रा. बुरूडगाव रोड), महेश शंकर दरंदले (रा. चिपाडेमळा, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर शहरातील कॅफेची तपासणी करत सात कॅफेचालकांना अटक केली.
अहिल्यानगर फरार), अविनाश विलास ताठे (वय ३२, रा. ताठेनगर, सावेडी), मंगेश रमेश देठे (वय १९, रा. भगवती कोल्हार, ता. राहाता), महेश सातपुते, (रा. अहिल्यानगर फरार) व कृष्णा अनिल कराळे (वय १९, रा. तपोवन रोड, ज्ञानसंपदा शाळेच्या पाठीमागे) यांच्याविरुद्ध कारवाई करून कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलिस ठाणे येथे महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १२९, १३१ (क) प्रमाणे ०५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पथकाने सदर कॅफेमध्ये मिळून आलेल्या तरुण-तरुणींना समज देऊन सोडून दिले.
Breaking News: Police expose obscene activities in cafes