अनोळखी मोबाईल नंबरवरून मेसेज आला अन ….आणखी एक मनिषाचे कृत्त्य उघडकीस
Loni Crime: बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैशांची मागणी केल्याबद्दल पोलिसांत गुन्हा दाखल.
राहता: राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावातील किरण आहेर यांची षडयंत्र रचून बदनामी केल्याची घटना ताजी असताना याच गावातील शरद आहेर यांना बदनामीची धमकी देऊन पैसे घेतल्याबद्दल ती मनीषा व तिच्या दोन साथीदारांवर लोणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी खुर्द येथील किरण किसनराव आहेर यांना नाशिक येथील मनीषा विजय साबळे या महिलेने समाज माध्यमावर ओळख करून नंतर त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैशांची मागणी केल्याबद्दल लोणी पोलिसात मनीषा साबळे आणि तिच्या साथीदारांवर याच महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यात आरोपींना तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला असताना लोणी खुर्द येथील शरद बाबासाहेब आहेर यांनी मनीषा विजय साबळे, श्रीकांत तान्हाजी मापारी व रणजित उत्तम आहेर यांच्या विरुद्ध लोणी पोलिसात तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी शरद आहेर यांनी म्हटले आहे, अनोळखी मोबाईल नंबरवरून मला मेसेज आला होता. मी त्यांना कॉल करण्यास सांगितले. एक महिला माझ्याशी बोलत होती. तिने तुमचा डीपी आवडला म्हणून मेसेज केल्याचे सांगताना तिचे नाव मनीषा विजय साबळे रा.नाशिक असे सांगितले. ती माझ्याशी गोड बोलायची. तिने 29 जून रोजी मला भेटायला बोलावले. लोणी-तळेगाव रस्त्यावर बैलबाजाराजवळ संध्याकाळी मी भेटायला गेलो. तिने माझ्याकडे तुमचे सर्व कॉलचे रेकॉर्डिंग आहे. मला मदत करा नाही तर मी तुमची बदनामी करीन. तुमच्या विरुद्ध विनयभंग आणि बलात्काराचा प्रयत्न केला म्हणून पोलिसात तक्रार दाखल करीन. ती माझ्याशी लगट करू लागली.
कपडे काढू लागली. मी घाबरून गेलो. मी तिला पैसे दिले. तेवढ्यात तिथे अंधारातून रणजित आहेर आणि श्रीकांत मापारी हे लोणी खुर्द गावातील दोघे जण तिथे आले. त्यांनी मला लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. गावात कुणाला काही सांगू नको नाही तर तुझी बदनामी करू अशी धमकी दिली. मी घाबरून गेल्याने फिर्याद देण्यास उशीर झाला. पोलिसांनी मनीषा, रणजित व श्रीकांत यांच्याविरुद्ध गु.र.नं.470/23 भादवि कलम 388, 389, 120(ब), 506 नुसार गुन्हा दाखल केला.
Web Title: Police Crime for demanding money from them by threatening to defame them
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App