वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई
शिर्डी: साईबाबांच्या पावन भूमीत गुन्हेगारी व अवैध व्यवसाय बंद व्हावेत असा शिर्डी ग्रामस्थांनी निर्धार केला आहे. परंतु प्रशासकीय विभागाकडून लक्ष देणे गरजेचे आहे. शिर्डीचे पावित्र्य कसे अबाधित राहील याकडे पोलिसांनी अवैध व्यवसायांवर कारवाई करावी अशी मागणी शिर्डी ग्रामस्थांकडून होत आहे.
शिर्डीत काल सायंकाळी शिर्डी पोलिसांनी शेळके कॉर्नरसमोर दिवसा ढवळ्या व रात्री भर चौकात बंद दुकानासमोर बसून काही महिला वेश्या व्यवसाय करीत असल्याची नागरिकांची तक्रार होती. त्या परिसरातून नागरिकांना जाताना संकोचल्या सारखे वाटत . मात्र काही आंबट शौकीन याच परिसरात घुटमळत दिसायचे त्याचा त्रास बऱ्याच जणांना होत होता. नको झटे म्हणून कोणी तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. मात्र काल रात्री अचानक तेथे असलेल्या काही महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पोलीस नाईक मकासुरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामधील काही महिला आरोपी सार्वजनिक ठिकाणी उभ्या राहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हातवारे इशारे करून असभ्य वर्तन करत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस अधिक तपास करीत आहे. या कारवाईने ग्रामस्थांकडून पोलिसांचे कौतुक केले आहे.
Web Title: Police crackdown on prostitutes