Home अकोले ‘पिचडांची नात थोरातांच्या भेटीस’;  राजकारणात एन्ट्री करणार? अकोलेत चर्चा

‘पिचडांची नात थोरातांच्या भेटीस’;  राजकारणात एन्ट्री करणार? अकोलेत चर्चा

Breaking News | Akole: माजी आदिवासी विकासमंत्री स्व. मधुकरराव पिचड यांची नात गिरिजा पिचड म्हात्रे यांनी आज काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य बाळासाहेब थोरात यांची संगमनेर येथे सदिच्छा भेट.

'Pichada's granddaughter to meet Thorat' Will enter politics

अकोले : राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री स्व. मधुकरराव पिचड यांची नात गिरिजा पिचड म्हात्रे यांनी आज काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य बाळासाहेब थोरात यांची संगमनेर येथे सदिच्छा भेट घेतली. जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला आरक्षण आल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या सुनीता भांगरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे गिरिजा पिचड यांच्याकडून थोरात भेटीमागे तालुक्यात व जिल्ह्यात वेगवेगळे अर्थ काढण्यात येऊ लागले आहेत.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अकोले तालुक्यात काँग्रेस बळकटीसाठी व्यूहरचना आखली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर नवले, सोन्याबापू वाकचौरे, दादा पाटील वाकचौरे, आरिफ शेख, शिवाजी नेहे यांची बैठक घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी तालुक्यात उद्या (ता.३१) बैठकीचे आयोजन केले आहे. सुनीता भांगरे यांनीही जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित झाल्याने भाजपत प्रवेश केला. विखेंकडूनही भाजपला तालुक्यात बळ देण्यात येत आहे.

गिरिजा पिचड यांनी आज थोरात सदिच्छा भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गिरिजा या पदवीधर असून, त्यांच्याकडे वक्तृत्व कौशल्य व संघटन कौशल्य असून, त्यांनी चुलते माजी आमदार वैभव पिचड यांच्या विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रचार केला. विरोधकांना चपलख उत्तरे देऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. प्रत्येक गाव-खेड्यात पोहचून माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक व विकासकामांचा लेखाजोखा मांडून मतदारांची मने जिंकली होती. त्यांच्यासोबत डॉ. मधुरा पिचड, यश पिचड यांनी देखील ‘हम भी कुछ कम नहीं,’ हे दाखवून दिले होते. आजही पिचड कुटुंबीयांना मानणारा मोठा मतदार तालुक्यात आहे.

काँग्रेस पक्षाने पक्षाला बळकटी आणण्यासाठी नवनवीन व्यूहरचना आखली असून, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे गिरिजा यांच्याकडून थोरात यांच्या सदिच्छा भेटीमागे दडलंय काय, याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. मात्र पिचड कुटुंबीयात पक्षीय फूट पडणे अशक्य असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते सांगत आहेत. याबाबत गिरिजा यांच्याशी संपर्क साधला असता, त्या नॉट रिचेबल सांगण्यात आले. त्यामुळे ही भेट दीपावलीच्या शुभेच्छांसाठी होती की अजून काही संकेत देण्याची होती, ते काळच ठरवेल.

Breaking News: ‘Pichada’s granddaughter to meet Thorat’ Will enter politics

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here