एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा आवळून काट्यात फेकले
पारनेर | Parner: एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीचा गळा आवळून बेशुद्ध तरुणीला काट्यात फेकून दिल्याची घटना गुरुवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. म्हसणे फाटा औद्यागिक वसाहत परिसरात ही घटना घडली आहे.
या पिडीत तरुणीवर सुपे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिडीत तरुणीच्या गावाशेजारचा एक तरुण त्या तरुणीच्या कंपनीमध्ये नोकरीस आहे. तो तिच्याकडे नेहमी प्रेमाची मागणी करत असे. मात्र तरुणीकडून त्याच्या प्रेमास प्रतिसाद मिळत नव्हता. काही दिवसांपूर्वी त्याने तिला पुन्हा प्रेमाची मागणी घातली होती. लग्न करण्याचा प्रस्ताव त्याने ठेवला होता. परंतु पिडीत तरुणीने तरुणास कोणताही प्रतिसाद दिला नाही.
तुला माझ्याशी लग्न करावे लागेल नाही केले तर तुझ्या घरच्यांसह होणाऱ्या नवर्यालाही मारून टाकीन अशी धमकी तो देत असे.
गुरुवारी पहाटे पिडीत तरुणी कंपनीमध्ये जाण्यासाठी निघाली असता तिला वाटेत अडवले. तिचा गळा आवळला. त्यांनतर ती बेशुद्ध अवस्थेत गेल्यानंतर तिला काट्यात फेकून दिले. पोलीस निरीक्षक यांनी तरुणीचा गळा आवळण्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.
Web Title: Parner strangled the girl and threw her into a thorn