Home महाराष्ट्र पप्पी घे नाहीतर.. पी.टी. शिक्षकाकडून सात वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

पप्पी घे नाहीतर.. पी.टी. शिक्षकाकडून सात वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये पीटी शिक्षकाने शाळेतील ७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे.  

P.T. A seven-year-old girl was molested by a teacher

उल्हासनगर:  राज्यात मुलींवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाही. बदलापूर येथील एका शाळेत दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतांना आता उल्हासनगरमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. या शाळेतील पीटी शिक्षकाने शाळेतील ७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

एका शाळेतील पीटी शिक्षकाने शाळेतील ७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

आरोपी पि.टी. शिक्षकाने ७ वर्षीय मुलीला ‘मला मिठी मार, माझी पप्पी घे नाहीतर तुला मारेल…’ अशी धमकी दिली.  आरोपीने इतक्यावर न थांबता मुलीच्या  गालावर चुंबन घेऊन तिचा विनयभंग केला. ही बाब मुलीने घरी सांगितली. यानंतर पालकांनी मुलीसोबत जात पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पि.टी. शिक्षकाला अटक (Arrested)केली.

Web Title: P.T. A seven-year-old girl was molested by a teacher

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here