Home संगमनेर फक्त धाक आणि दडपशाही, संगमनेरात परिवर्तन घडवा : विखे पाटील

फक्त धाक आणि दडपशाही, संगमनेरात परिवर्तन घडवा : विखे पाटील

Sangamner Assembly Election 2024: आपला स्वाभिमान जागृत करून, या तालुक्यात परिवर्तन घडवा आणि हा तालुका दहशतमुक्त करण्याचा निर्धार करा, असे आवाहन असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

Only intimidation and repression, transform the Sangamaner

संगमनेर : गेल्या ४० वर्षात यांनी तालुक्याला फक्त धाक आणि दडपशाही दिली. आजही प्रत्येकाच्या घरी जावून दबाव आणण्याचे काम सुरू आहे. पण आता आपला स्वाभिमान जागृत करून, या तालुक्यात परिवर्तन घडवा आणि हा तालुका दहशतमुक्त करण्याचा निर्धार करा, असे आवाहन असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या निवडणूक प्रचारार्थ सावरगावतळ आणि पेमगिरी या ठिकाणी आयोजित केलेल्या प्रचार सभेत मंत्री विखे पाटील यांनी पुन्हा एकदा आ. थोरात यांच्यावर तोफ डागली. विखे पाटील म्हणाले, पेमगिरी सारख्या ठिकाणी चांगले पर्यटनस्थळ निर्माण होवू शकते. या माध्यमातून या भागात रोजगाराच्या संधी आहेत, महायुती सरकारच्या माध्यमातून यासाठी निधी देण्याचे आश्वासित करुन, मंत्री विखे पाटील म्हणाले की, या तालुक्यातील समृध्दतेला सहकारी साखर कारखाना कारणीभूत ठरला. पद्मश्री डॉ. विखे पाटील, दत्ता देशमुख, बी.जे खताळ पाटील यांच्या योगदानातून हे सर्व उभे राहीले. पण त्याची जाणीव आणि आठवणही यांनी ठेवली नाही, असा टोला लगावून तुमची लोकप्रियता एवढी आहे तर, जनतेचे कल्याण का नाही केले, असा सवालही केला.

दरम्यान, यांचे राजकारण फक्त माफीयांच्या भोवती अवलंबून आहे. त्यांच्या माध्यमातून गावागावात धाकदडपशाही केली गेली. पण या निवडणूकीत जनता जागृत झाली आहे. युवकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे, असा स्वाभिमान जागृत ठेवून या तालुक्यात परिवर्तन करण्याची भूमिका बजवा, हा तालुका दहशतमुक्त करण्यासाठी महायुती सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील असे मंत्री विखे पाटील यांनी आश्वासित केले.

Web Title: Only intimidation and repression, transform the Sangamaner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here