खळबळजनक: अनैतिक संबंधातून एकाचा खून, मामा- भाच्याला अटक
Sambhajinagar: अनैतिक संबंधातुन एकाचा खून (Murder) झाल्याची घटना.
संभाजीनगर: अनैतिक संबंधातुन एकाचा खून झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड येथे समोर आली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर आणखी दोघांचा शोध सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रेनुकाबाई मेहर यांनी 15 जुन 2023 रोजी आपला पती राजू बाबुलाल महेर यांची मिसींग तक्रार सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल केली होती. ही तक्रार झाल्यानंतर सायबर सेल औरंगाबद यांच्या मदतीने पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली.
यावेळी पोलिस तपासात राजू मेहेरचा अनैतिक संबंधातून खुन झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपींनी 4 जून 2023 रोजी राजु महेर याचा खुन केला. तसेच मृतदेह अजिंठा घाटात फेकुन दिला होता. पोलिसांनी शोध घेतला असत त्यांना कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
या घटनेतील आरोपी गणेश महेताब महेर आणि करण नारायण बारवाल या मामे भाचे दोघांना अटक केली आहे. तसेच आणखी दोन आरोपींना लवकरच ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहे.
Web Title: One Murder due to immoral relationship, uncle-nephew Arrested
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App