Accident: आठ दिवसात तिसरी घटना अपघातात एक ठार
Ahmednagar Accident: आठ दिवसात तिसरी घटना : पत्नी, सासू, भाचा जखमी.
देवळाली प्रवरा : नगर-मनमाड मार्गावरील राहुरी सूतगिरणी जवळ बाजार समिती पेट्रोल पंपासमोर ऊस करणाऱ्या वाहतूक डबल ट्रेलर ट्रॅक्टर व अज्ञात वाहनाच्या धडकेत बाभूळगाव येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाला. या अपघातात दोन महिलांसह तिघे जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवार २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता घडली.
बाभूळगाव व्यावसायिक आबासाहेब बापूसाहेब ससाणे (वय २८) हे मंगळवारी सकाळी दुचाकीवरून देवदर्शनासाठी पत्नी, सासू व भाच्यासमवेत जात असताना सूतगिरणी जवळील बाजार समिती पेट्रोल पंपासमोर दुचाकीला डबल ट्रेलरचा कट बसून अज्ञात वाहनाची धडक बसली. या अपघातात आबासाहेब बापूसाहेब ससाणे (वय २८) जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी अंजली ससाणे ही गंभीर जखमी झाली आहे. तर सासू मीराबाई वायदंडे व भाचा कार्तिक वायदंडे (रा. चांदेगाव, ता. राहुरी) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्वांवर राहुरी फॅक्टरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी स्थानिक नागरिक, प्रवासी व शिवबा प्रतिष्ठाणचे रुग्णवाहिका चालक रवी ढोकणे, देवळालीच्या रुग्णवाहिकेचे रवी देवगिरे यांनी मदतकार्य केले. या अपघाताबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया उशिरापर्यंत सुरू होती.
रस्ता दुरुस्ती कृती समिती घालणार दशक्रियाविधी
गेल्या आठ दिवसांत राहुरी सूतगिरणी परिसरात तीन मोठे अपघात झाले आहेत. या अपघातात पाच नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांचे जीव गेले तरीही सरकार अद्यापही गंभीर नसल्याने अपघातात मृत पावलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ व प्रशासनाच्या निषेधार्थ नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने शनिवार, ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता नगर-मनमाड मार्गावरील राहुरी सूतगिरणीजवळ दशक्रियाविधी घालून सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीचे देवेंद्र लांबे व वसंत कदम यांनी दिली.
Earn Money Online | या पाच मार्गाद्वारे तुम्ही महिन्याला २५ ते ३० हजार ऑनलाईन कमवू शकता!!!
Web Title: One killed in an accident, third incident in eight days
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App