प्रेमात अडथळा, दगडाने ठेचून हत्या, दोघांना अटक, अहमदनगर घटना
Ahmednagar Murder News: अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अनोळखी पुरुषाच्या डोक्यात काहीतरी वस्तुने मारहाण करुन, चेहरा विद्रुप करुन खून केला व रोडचे बाजुला असलेल्या खड्ड्यात टाकून पुरावा नष्ट केला.
श्रीरामपूर | Shrirampur: सहा महिन्यानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले असून याप्रकरणी परराज्यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, दि. 18 जानेवारी 23 रोजी श्रीरामपूर ते वाकडी रोडवरील खंडाळा गावच्या शिवारात यशवंत बाबा चौकीजवळ कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अनोळखी पुरुषाच्या डोक्यात काहीतरी वस्तुने मारहाण करुन, चेहरा विद्रुप करुन खून केला व रोडचे बाजुला असलेल्या खड्ड्यात टाकून पुरावा नष्ट केला. याबाबत पोलीस नाईक मच्छिंद्र किसन शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं 57/2023 भादंवि कलम 302, 201 प्रमाणे अनोळखी इसमाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रेमात अडथळा बनला म्हणून सोनू चौधरीला मध्य प्रदेशातून श्रीरामपूरला बोलावले. प्रेयसीसोबत तुझे लग्न लावून देतो, असे सांगून दारू पाजली व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दगडाने ठेचून मारले, अशी कबुली श्रीरामपूर येथील खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींनी दिली.
भूपेंद्र शिवप्रसाद रबि (वय २३) व सुरज रामनाथ रावत (दोघेही मूळ रा. सुनौरा, ता. अमरपाटण, जि. सतना, मध्य प्रदेश, हल्ली मुक्काम संजयनगर, श्रीरामपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
श्रीरामपूर ते वाकडी रोडवर खांडगावच्या शिवारात एका परप्रांतीय व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. याबाबत श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून करण्यात आला. यातील मृत व्यक्तीचा पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन तपास केला असता, मृत व्यक्ती सोनू चौधरी असल्याचे निष्पन्न झाले. सोनू चौधरी हा भूपेंद्र रब याच्याकडे श्रीरामपूरला गेला होता, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी भूपेंद्र याचा श्रीरामपूर येथे तपास केला असता तो सापडला. त्याने सुरज याच्या मदतीने सोनू चौधरीचा खून केल्याची कबुली दिली. भूपेंद्र याचे मध्य प्रदेशातील महिलेशी प्रेमसंबंध होते. पतीसोबत वाद झाल्याने ही महिला भूपेंद्रसोबत श्रीरामपूरला राहात होती. या महिलेचे सोनू चौधरी याच्याशीही प्रेमसंबंध होते. याबाबत भूपेंद्रने महिलेकडे विचारणा केली असता, तिने सोनूसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. त्याचा भूपेंद्रला राग आला. त्याने सोनू चौधरीला मध्य प्रदेशातून बोलावून घेतले. तुझे तुझ्या प्रेयसीसोबत लग्न लावून देतो, असे सोनूला सांगितले. सोनूही श्रीरामपूरला आला. दोघा आरोपींनी सोनू चौधरीला दारू पाजली व शहरापासून काही अंतरावर नेऊन त्याचा दगडाने ठेचून खून केला, अशी कबुली भूपेंद्रने दिली.
ताब्यातील दोघांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे. पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केली.
Web Title: Obstacle in love, stoned Murder two arrested
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App