संगमनेरात कॅफे सेंटर’च्या नावाखाली अश्लील कृत्यांचा थाट
Breaking News | Sangamner Crime: संगमनेर पोलिसांची धडक कारवाई, दोघांवर गुन्हा दाखल

संगमनेर: काही दिवसांपूर्वीच शहरात नशेचे इंजेक्शन (ड्रग्स) विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्या प्रकरणाची धग अजून शांतही झाली नाही, तोवर आता पुन्हा एक हादरवून टाकणारा प्रकार समोर आला आहे. शहरातील अकोले नाका परिसरात ‘कॅफे सेंटर’च्या नावाखाली तरुण-तरुणींना अश्लील चाळ्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचा भंडाफोड संगमनेर ती शहर पोलिसांनी केला आहे.
गुप्त नाहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी (दि. ८ नोव्हेंबर) दुपारी सुमारास या ‘कॅफे’वर धाड टाकली असता, काही युवक-युवती आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या पथकाने ही कारवाई पोलीस निरीक्षक समीर बारबकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली. चौकशीत पोलिसांना समजले की सदर ठिकाणी परवान्याचा गंभीर गैरवापर करण्यात आला आहे. या जागेचा मालक योगेश सुरेश वारुंगसे (वय ४५, रा. स्वातंत्र्य चौक, संगमनेर) याने नगरपरिषदेकडून ‘मोबाइल शॉपी व दुरुस्ती’साठी व्यवसाय परवाना घेतला होता. मात्र त्या परवान्याच्या आडून सोपान एकनाथ पवार (वय २४, रा. कोठे मळा, संगमनेर) या युवकाने ‘कॅफे’च्या नावाखाली अनधिकृत व्यवसाय सुरू करून अश्लील कृत्यांना प्रोत्साहन दिले होते.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल विजय आगलावे यांनी फिर्याद दिली असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात अशा प्रकारच्या अनधिकृत, अश्लील कृत्यांना पोलिसांकडून कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा इशारा देत पोलीस निरीक्षक सुनील बावकर यांनी सांगितले की, संगमनेरमध्ये अशा प्रकारच्या ‘कॅफे संस्कृती ‘विरुद्धची कारवाई पुढेही अधिक तीव्र करण्यात येईल. शहरातील युवकांच्या भविष्यास घातक ठरणाऱ्या या प्रवृत्तींवर पोलिसांचे चांगलेच लक्ष आहे. या कारवाईनंतर संगमनेरकरांमध्ये संतापाची लाट असून, शहरातील अन्य अशा संशयित ठिकाणांवरही तत्काळ कारवाईची मागणी होत आहे.
Breaking News: Obscene acts staged in the name of ‘Cafe Center’ in Sangamner
















































