Home अहमदनगर अहमदनगर: तरुणाच्या त्रासामुळे परिचारिका महिलेची आत्महत्या

अहमदनगर: तरुणाच्या त्रासामुळे परिचारिका महिलेची आत्महत्या

Breaking News | Ahmednagar: परिचारिका महिलेसोबत प्रेमाचे संबंध निर्माण करून तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे कंटाळून तिने आत्महत्या केल्याची घटना.

Nurse commits suicide due to youth's troubles

श्रीरामपूर : शहरातील एका परिचारिका महिलेसोबत प्रेमाचे संबंध निर्माण करून तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे कंटाळून तिने आत्महत्या केल्याची घटना घडली.

आत्महत्येप्रकरणी मयत तरुणीच्या भावाने तरुणाविरुद्ध पोलिसांकडे फिर्याद नोंदविली आहे. याप्रकरणी सागर भाऊसाहेब उबाळे (रा. रांजणखोल, रा. राहाता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीची बहीण पुणे येथे नोकरी करीत होती. तिची सहा महिन्यापूर्वी सागर उबाळे याच्याशी ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांनी दोघांना लग्न करावयाचे असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते.

मात्र तसे काही घडले नाही. बहिणीच्या मोबाईलमध्ये सागर याने लग्न करण्यास दिलेला नकार व झालेली फसवणूक याचा तपशील मिळाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Nurse commits suicide due to youth’s troubles

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here