Home अहमदनगर तरुणाची १५ हजार रुपयांची फसवणूक, २० रुपये पडले महागात

तरुणाची १५ हजार रुपयांची फसवणूक, २० रुपये पडले महागात

नेवासा(News): कुकाने येथील तरुणास एका वेबसाईटवरील नोकरी अर्ज भरताना २० रुपये चार्ज भरण्याचा मेसेज आला. २० रुपये भरीत असताना ओटीपी दिला असता तरुणाच्या बँक खात्यातून पंधरा हजार रुपये काढण्यात आले. याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणाने सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे.

कुकाणे येथील राजन पांडुरंग देशमुख २ जून रोजी एका संकेतस्थळावरून नोकरीसाठी अर्ज भरीत असताना वेबसाईटवरून एसएमएस चार्जेस २० रुपये अदा करण्यास सांगितले. पैसे ऑनलाईन पाठविताना अनेक वेळा ओटीपी प्राप्त झाला आणि २० रुपयांची रक्कम पाठविताना बँक खात्यातून १५ हजार रुपये काढून घेण्यात आले.

१५ हजार रुपये वजा झाल्याचे पाहून त्यांनी नोकरीमिंग डॉट कॉम सर्विसेसला फोन करून विचारणा केली. मात्र आम्हाला पैसे प्राप्त झाले नाही असे उत्तर दिले. अनेक वेळा विनंती करूनही पैसे परत न मिळाल्याने देशमुख यांनी नगर येथे सायबर सेलला तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.   

Website Title: News young man online fraud

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here