अवघ्या ११ वर्षाच्या मुलीचा विवाह रोखण्यात पोलिसांना यश
पाथर्डी(News): पाथर्डी तालुक्यात शिरापूर येथे अवघ्या ११ वर्षीच्या मुलीचा विवाह लावण्यात येत होता. मात्र पोलिसांनी हा बालविवाह रोखला आहे. मुलीचे आई वडील हे उस तोडणी कामगार आहेत. याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील ११ वर्षीच्या मुलीचा विवाह शेवगाव तालुक्यातील हसनापूर येथील २५ वर्षीय मुलगा यांच्या संगनमताने लावण्यात येत होता. या मुलीचा साखरपुडा ६ जून रोजी तिच्या आत्याच्या घरी करण्यात आला होता. मुलीचे आई वडील हे उस तोडणी कामगार आहेत. मुलगी खुंटफळ येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत होती.
या विवाहाची माहिती पोलिसांना समजली त्यांनी रविवारी विवाहस्थळी जाऊन वधू वर यांच्या नातेवाईक यांना ताब्यात घेतले. रात्री सर्वाना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
Website Title: News preventing marriage of 11-year-old girl